Thursday, June 9, 2011

खुर्चीभोवती फिरती सारे...


’या टोपीखाली दडलंय काय?’ निळू फुले व डॉ. श्रीराम लागू यांच्या सामना चित्रपटातील हे गीत आहे. त्यात खुर्चीसाठी मंत्री काय काय करतात हे दर्शविलेले आहे. ’किस्सा कुर्सिका’ यातही खुर्चीभोवती फिरणाऱ्या पुढाऱ्यांच्यी कहाणी आहे.
खुर्ची ही सर्वांनाच प्रिय असते. ऑफिसर, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्र्पती, उपराष्ट्र्पती, सभापती, अध्यक्ष या सर्वांनाच खुर्ची लागते. या सर्वांच्या स्थानांसाठी काय काय करावे लागतात हे सांगणे सोपी गोष्ट नाही. 
ऑफिसर बनण्यासाठी U.P.S.C  परीक्षा पास व्हावे लागते. तेव्हा तो व्यक्ती I.A.S  ऑफिसर बनतो. तेथे ज्ञानची खरी कसोटी लागते. मात्र पेपर  फुटीचे घोटाळे करुन जे असे ऑफिसर बनातात ते म्हणजे खुर्चीवर बसलेले सर्पच होत, ते कोणाला केव्हा डसतील व नाश करतील याचा तपास लागणार नाही.
मंत्रिपदावर जाण्यासाठी आमदरकी व खासदारकीची निवडणूक लाढवादी लागते. पक्षाचे पाय धरावे लागतात. नंतर मतदारसंघांमध्ये मतदारांचे पाय धरावे लागतात. निवडणूक आयोग आचारसंहिता लागू करतो; त्यामुळे प्रचार करतांना बरीच बंधने येतात. निवडून येण्यासाठी उमेदवार व कार्यकर्ते ज्या कसरती करतात त्या कधी कधी मनोरंजक तर कधी कधी रक्तरंजक असतात. सारे काही खिर्चीसाठीच चाललेले असते.








लोकशाही ही एक जीवनपद्ध्ती आहे. भारतात बहुपक्षीय लोकशाही आहे. तिकडे इंग्लंड व अमेरिकेत सत्ताधारी व विरोधी असे दोनच पक्ष असतात; त्यामुळे खुर्चीचा खेळ सोपा असतो. परंतु भारतात बहुपक्ष पद्धतीमुळे अनेक वेळा त्रिशंकु अवस्था तयार होते. सरकारमध्ये अनेक पक्षांचे आमदार  खासदार मंत्री बनतात. त्यांच्यात धोरणांवरुन व पक्षांच्या मुक तत्त्वांवरुन मतभेद होतात. कित्येकदा सरकार कोसळते आणि व नव्या निवडणूका घेण्याची वेळ येते. मतदार राजा पुन्हा संभ्रमात पडतो खुर्चीवर बसवावे कुणाला?  मोठमोठी आश्वासणे देणारी नेते निवडून जातात. निवडून गेल्यावर ते खरोखर दिलेली आश्वासने पाळतात क? हा संशोधनाचा विषय होतो. शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर होते पण खुर्चीतले शुक्राचार्य हे पॅकेज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू देतात काय? हे पॅकेज खिशात घालुन मोठ्या मोठ्या इमारती उभ्या राह्तात खरे!  जर दिलेली मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही तर आत्महत्या करण्याची वेळ त्यांच्यावर येते. परदेशाशी करार करतांना आपल्या खुर्चीबरोबर आपल्या देशाच्या हिताचा विचार केला पाहिजे. 

खुर्चीभोवती फिरती सारे! पण  हे खुर्चीभोवती फिरणाऱ्यांनो सावध व्हा! जनता आता हुशार झाली आहे. 
                                   देशाच्या सख्यत्वासाठी । 
                                   पडाव्या जीवलगासी तुटी ॥
                                   सर्व अर्पावे सेवटी ।
                                   प्राण तोही वेचावा ॥